Ticker

6/recent/ticker-posts

अन् वन अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- वन परिक्षेत्र लाखनी व साकोली चे सीमावर्ती भागात आठवडाभर बस्तान मांडून असलेल्या हत्तीच्या कळपाने अनेक गावातील शेतकऱ्यांच्या धानाचे पूजने, ऊस वाडी, पाइप व मळणी केलेल्या धानाचे नुकसान करून वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झोप उडविली होती. हत्तीचे लोकेशनसाठी वन विभागाने ड्रोन आणि पश्चिम बंगालच्या चमूची मदत घेतली होती. उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) महीप गुप्ता यांचेसह वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी भेट दिली. शेवटी आठव्या दिवशी वन विभागाची रणनीती यशस्वी ठरल्याने पालांदूर परिसरातील एकाच दिवशी तब्बल ३६ शेतकऱ्यांचे नुकसान करून हत्तीचा कळप चुळबंद ओलांडून लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्याने वन अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला. 
          २७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातून २३ संख्या असलेला हत्तीचा कळप साकोली वन परिक्षेत्रातील सिरेगाव/बांध, केसलवाडा, झाडगाव, शिवणी/बांध वरून चुलबंद नदी ओलांडून लाखनी व साकोली वन परिक्षेत्राचे सीमेवरील मोहघाटा, बरडकिन्ही चे घनदाट वनक्षेत्रात मुक्कामी आला. दिवसभर शांत राहून रात्रीचे सुमारास वनक्षेत्रालगत च्या शेतशिवारात जाऊन मळणी केलेल्या धानाचे बोरे, धानाचे पुजने, शेतातील पाइप लाईन आणि स्विच रूम चे नुकसान करू लागल्याने वन अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झोप उडाली होती. हत्तीच्या कळपाने रेंगेपार/कोहळी, चिचटोला, शिवणी, गडपेंढरी, पेंढरी, चान्ना, धानला, कन्हाळगाव, निमगाव, घोडेझरी, खुनारी, खराशी, इत्यादी गावातील शेकडो शेतकऱ्यांचे धान पिकाचे नुकसान केले. हत्तींची हालचालींवर ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात आली. तसेच हुस्कावण्यासाठी पश्चिम बंगाल चे चमूला पाचारण करण्यात आले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वन्यजीव प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, उपसंचालक नवेगाव-नागझिरा जेफ, भंडारा चे उपवन संरक्षक राहुल गवई, गोंदिया चे उपवन संरक्षक कुलराज सिंग, वन्यजीव सहाय्यक वन संरक्षक पाटील यांनी हत्तीच्या कळपाचे लोकेशन असलेला आणि नुकसान केलेल्या भागाचा दौरा करून उपाययोजने बाबद निर्देश दिल्याने आठवे दिवशी प्रयत्नास यश येऊन हत्तीचा कळप चूलबंद नदी ओलांडून सालेबर्डी, दिघोरी/मोठी मार्गे गोंदिया जिल्ह्यात परतल्याने वन अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हत्तीच्या कळपाकडून जीवितहानी होऊ नये. तथा कमीतकमी वित्तहानी होण्यासाठी साकोली चे सहाय्यक वनसंरक्षक आर.पी. राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, शेखर मेंढे, घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक जे.एन. बघेले, मुकेश श्यामकुवर, उईके यांचेसह सर्वच वनरक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या