• उसगाव येथील घटना
• लाखनी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324
भंडारा :- प्रकृती बरी नसल्यामुळे मनावर परिणाम घेऊन वन विभागाच्या कक्ष क्रमांक १०४ जंगल परिसरात येनाच्या झाडाला अटई च्या झाडाचे वाकाची दोरी तयार करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी(ता.३१) चे सकाळी ७:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. मृतकाचे नाव रमेश शिवराम राऊत(६३) रा. ऊसगाव/चांदोरी असे आहे. लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
फिर्यादी श्रीकृष्ण राऊत हे आई वडील व भावासह एकच घरी वेगवेगळे वास्तव्यास असून मजुरीचे काम करतात. ३० जुलै रोजी सकाळी मजुरीचे कामाने बाहेर गेले असता वडील रमेश राऊत यांची प्रकृती बरी नसल्याने ते घरीच होते. मजुरीचे काम आटोपून दुपारी ३:०० वाजता दरम्यान घरी येऊन हातपाय धुतल्यावर वडीलांबाबद आईस विचारणा केली असता शौचास गेल्याचे सांगितले. पण बराच वेळ झाल्यावर परत न आल्याने घरा शेजारील जंगलात शोध घेतला. पण वडील मिळून न आल्याने घरी येऊन लहान भाऊ व शेजाऱ्यांसह रात्री पर्यंत वडिलांचा शोध घेतला. पण मिळून आले नाही. सोमवारी(ता.३१) सकाळी परत कुटुंबीय व गावकऱ्यांसह वडिलांचा शोध घेतला असता कक्ष क्रमांक १०४ चे जंगल परिसरात येनाच्या झाडास गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आला. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कलम १७४ सीआरपीसी नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार आत्राम तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या