Ticker

6/recent/ticker-posts

आठवडाभरापासून १६ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता


• गडेगाव येथील घटना 

• लाखनी पोलिसांत हरविल्याची तक्रार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324

भंडारा :- स्वर्गीय निर्धनराव वाघाये पाटील कनिष्ठ महाविद्यालय गडेगाव येथील इयत्ता ११वी चा विद्यार्थी धवल उर्फ पियूष प्रशांत कुथे हा मंगळवारी(ता.२५) पासून घरून निघून गेला असला तरी आठवडा भराचा कालावधी लोटून सुद्धा त्याचा ठावठिकाणा लागला नसल्यामुळे कुटुंबीय काळजीत पडले असून वडिलांनी मुलगा हरविल्याची लाखनी पोलिसांकडे फिर्याद नोंदविली असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात या विद्यार्थ्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

              धवल उर्फ पियूष हा कुटुंबियांसह गडेगाव येथे वास्तव्यास आहे. तो नेहमी मोबाईल खेळत असतो. म्हणून त्यास मोबाईल खेळू नको अभ्यासाकडे लक्ष दे. असे नेहमी पालक हटकत असत. घटनेचे दिवशी(ता.२५) सकाळी ८:०० वाजता दरम्यान आई वडील शेतात कामासाठी जात असताना धवल घरी होता. त्याला अभ्यास झाल्यावर घरी असलेल्या शेळ्या चारण्यासाठी शिवारात घेऊन जाशील असे सांगून आई वडील शेतात निघून गेले. सायंकाळी ५:३० वाजताचे सुमारास घरी परतले असता मुलगा घरी दिसून आला नाही व शेळ्या व मोबाईल घरीच होता. मुलगा दिसून न आल्याने त्याचा आजूबाजूला, गाव व नातेवाईकांत शोध घेतला. पण मिळून आला नाही. माझे संमतीशिवाय कुणीतरी इसमाने त्याला पळवून नेले असावे. अशी वडिलांनी पोलिस ठाणे लाखनी येथे फिर्याद दिली. लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २९९/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम ३६३ भादवि अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार गौरीशंकर कडव तपास करीत आहेत. 
*असे आहे मुलाचे वर्णन(चौकट)*
रंग सावळा, उंची ५ फूट, बांधा सडपातळ, अंगात लाल हाफ टी-शर्ट व निळ्या रंगाचा फुल जीन्स पँट, केस काळे व लांब, पायात बाजारू चप्पल, त्याला मराठी व हिंदी भाषा बोलता येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या