रुपाली मेश्राम चित्रा न्युज
अमरावती - जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय अमरावती मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे अमरावती जिल्ह्यातील 104 हत्तीरुग्णांची ग्रेडनिहाय तपासणी करण्यात आली.
या सर्व हत्तीरुग्णांची तपासणी डॉ.राऊत सर, डॉ.चाकोरे सर, डॉ.निशा पवार मॅडम यांनी केली व समुपदेशन अश्विनी म्हेसणे मॅडम, श्री.श्रीभक्ते सर यांनी केलं.
हे शिबिर मा.उपसंचालक डॉ.भंडारी सर, मा.सहायक संचालक डॉ.जोगी मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सौंदळे सर, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आसोले सर, मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर, मा.हत्तीरोग अधिकारी श्री.दिनेश भगत सर, डॉ.जुनेद सर, प्र.वै.अधिकारी श्री.जी.बी.राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
या शिबिरात हत्तीरुग्णांना सखोल मार्गदर्शन व आरोग्य शिक्षण व या सर्व शिबिराचे नियोजन आरोग्य कर्मचारी श्री.प्रकाश दातीर व श्री.अशोक राठोड यांनी केले. यावेळी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथकातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या