मोईन कादरी हिंगोली
हिंगोली :-श्री क्षेत्र. गोदावरी धाम सरला बेट ता. श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील मठाधिपती रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज रा. सरला बेट. ता. वैजापूर यांनी साप्ता दरम्यान प्रवचन मध्ये उपस्थित जनसमुदाया समोर मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची प्रतिमा मलीन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन करून संकल मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावे. सर्व मुस्लिम बांधवांनी तक्रार अर्ज
केलेली आहे, रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पांचाळे ता. सिन्नर, जिल्हा. नाशिक या सार्वजनिक ठिकाणी यांनी मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या 50 व्या वर्षी सहा वर्षाच्या मुली सोबत विवाह् केला. मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्याचार होतात त्याचे हेच कारण आहे ज्याच्या आदर्श अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे असे अनेक वक्तव्य रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी केले आहेत. अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लीम या दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून जातीय तणाव व द्वेष पसरवण्याचा उद्देशाने जाणीवपूर्वक
प्रवचन देऊन प्रयत्न केला आहे. सदर बाब हे अतिशय गंभीर स्वरूपाची आहे, सदर प्रबचन हे सोशल मीडिया फेसबुक व्हाट्सअप यावर सुमारे तीन मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला यामुळे असे वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाचे दैवत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांची बदनामी केली, वसमत शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात यावे. असे तक्रार अर्ज मुस्लिम
समाजाच्या वतीने वसमत शहर.पोलीस स्टेशनला देण्यात आले. या अर्जावर अनेक् मस्लिम यांची स्वाक्षरीने व समाजाचे इतर लोक सोबत तक्रार अर्ज देण्यात आले,
0 टिप्पण्या