Ticker

6/recent/ticker-posts

शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा मसुदा अभिप्रायासाठी मुदत वाढवा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी


राकेश आसोले चित्रा न्युज 
चंद्रपूर : राज्य शासनाने अभ्यासक्रम आराखडा शालेय वर्ष 2024 मसद्युाबाबत 3 जूनपर्यंत अभिप्राय व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्याची मुदतवाढ चार महिन्यांनी करण्यात यावी, याकरिता सम्यक विद्यार्थी आंदोलनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याच अनुषंगाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, चंद्रपूर जिल्हा बल्लारपूरच्यावतीने  नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

या प्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष सविता काशिनाथ नाईक, अंकिता निमगडे, वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरचे शहराध्यक्ष ओम रायपुरे, कार्याध्यक्ष उमेश कडू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या