Ticker

6/recent/ticker-posts

शहर पोलिस आयुक्तपदी संदीप पाटील

संघदीप मेश्राम चित्रा न्युज 
छत्रपती संभाजीनगर :-नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आयपीएस अधिकारी संदीप संदीप पाटील पाटील यांच्याकडे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा पाटील शहरात दाखल झाले. शनिवारी सकाळी पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पाटील यांच्याकडे
 पदभार सोपवण्यात आला. सध्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख असलेले पाटील नागपूरमधून कारभार सांभाळतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलिस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या पाटील यांचे साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण झाले. इस्लामपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत यूपीएससीची तयारी केली. त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर खामगाव, गडचिरोली, सातारा, पुणे ग्रामीण येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल १७४ नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते. मर्टिनटोलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा केंद्रीय नेता मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवादी ठार झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या