Ticker

6/recent/ticker-posts

ग्रांम पंचायत मोहाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याची जयंती उत्साहात साजरी •••••••••••••


रुपाली मेश्राम चित्रा न्युज 
गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज रॉजमॉता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर याची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख पाहुणे ग्रांम पंचायत सदस्य योगराज भोयर, प्रभा पंधरे,माजी उपसरपंच श्रीराम पारधी, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, सेवानिवृत्त पोस्टमास्तर हिरालाल महाजन, सामाजिक कार्यकर्ता शिवराम मोहनकार,लक्षीराम भोयर, सीताराम भोयर, नारायण बघेले,मोहनकिशोर मौदेकर, कमलेश पारधी, सेवानिवृत्त पोलिस पाटील केशोराव डोहाळे, विठ्ठल ठाकरे,प्रेमलाल चोरवाडे, गुणवत्ता मोहनकार, चुळामन पटले,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी मान्यवरांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म ३१ मे इ स १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे झाले त्याचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यानी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले एवढंच नव्हे तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औघोगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला अहिल्याबाईना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रांमसेवक पी बी टेंभरे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या