Ticker

6/recent/ticker-posts

हाळी येथे भल्या पहाटे देशी दारु विकणा-या व्यक्तीशी दारुबंदीच्या अधिका-याला लागलाय "लळा"

दारुबंदीच्या वरीष्ठांना पण येतोय त्याचा कळवळा !!

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-सकाळी दहा ते राञी दहा ही वेळ दारु दुकाणांसाठी आहे.माञ,उदगीर तालुक्यातील हाळी येथे एकुलते एक असलेले देशी दारुचे दुकाण हे भल्या पहाटे म्हणजे साडेपाच ते 6 वाजता उघडत आणि राञी 11ते11-30 वा. बंद करीत असल्याचे बोलले जाते. तसेच याबाबत अनेकदा अनेकांनी आवाज उठवुन सुध्दा सबंधित दारु बंदी खाते व या खात्याचे तालुका व जिल्हा पातळीवरील सं.अधिकारी कारवाई का करीत नाहीत.किरकोळ विक्रीसाठीचा परवाना असलेल्या हाळीच्या दारु दुकाणातुन ठोक मध्ये रोज 20 ते 25 बाॅक्स देशीदारुची वाहतूक होतेय ती कोणाच्या मदतीने
आणि हा सगळा कारभार दारुबंदी खात्याच्या या भागाच्या संबंधित अधिका-याला माहिती असुन सुध्दा आजवर कारवाई केली नाही.याचेच नवल वाटते.शासनादेश,नियम हे सर्व पायदळी तुडवुन पहाटे 5 वा.पासुन  ते राञी 11 साडेअकरा पर्यंत दारुची ठोक व किरकोळ विक्री करणा-या या दुकाणदाराशी संबंधित दारुबंदी अधिका-याचा "लळा" लागल्यानेच हा दुकाणदार बिनधास्त दिसतोय.हे सत्य असलेतरीही दारुबंदीच्या वरीष्ठ  अधिका-याला या दुकाणदाराचा "कळवळा" का? आलाय.हे कांही कळायला मार्ग नाही.
तेंव्हा याकडे लक्ष देणार कोण आणी कारवाई करायची हिंम्मत दाखवणार कोण? याकडे जनतेचे लक्ष लागलेय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या