Ticker

6/recent/ticker-posts

आवाळपूर केंद्रस्तरिय नवरत्न स्पर्धेत आसन खुर्द शाळा अव्वल


चित्रा न्युज ब्युरो
 कोरपना:- तालुक्यातील आसन खुर्द केंद्रांतर्गत नवरत्न स्पर्धा नुकतीच पार पडली.
     कोरपना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आमचे प्रेरणास्थान मा. सचिनकुमार मालवी , गडचांदुर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. कल्याण जोगदंड, आवाळपूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. पंढरी मुसळे यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच प्राथमिक व माध्यमिक गटात स्पर्धा घेऊन नवरत्न स्पर्धा आयोजित केली गेली.यात आसन खुर्द च्या जिल्हा परिषद शाळेने नऊ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत अव्वल स्थान पटकाविले.
      यात विद्यार्थांनी कथाकथन स्पर्धा, स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, बुद्धिमापन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, स्वयंस्फुर्त लेखन स्पर्धा, एकपात्री अभिनय,स्मरणशक्ती स्पर्धा अश्या नऊ प्रकारच्या स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता.
        कार्यक्रमांचे नियोजन आवाळपूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. पंढरी मुसळे यांनी केले. तज्ज्ञ परीक्षक म्हणून मा. वैद्य सर व राठोड सरांनी काम पाहिले.
      नवरत्न स्पर्धेचा मुख्य उद्देश उपरे सरांनी तर नियम मडावी सरांनी समजावून सांगितले. आसन खुर्द येथील शाळेने प्रथम क्रमांक नऊ विद्यार्थांनी तर द्वितीय क्रमांक सहा विद्यार्थांनी असे एकूण पंधरा क्रमांक प्राप्त केले. शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे कौतुक करुन तालुकास्तरीय स्पर्धेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
     शाळेचे मुख्याध्यापक श्री.घनश्याम पाचभाई ,श्री.मारोती सोयाम,श्री. संजय निखाडे व श्री. तुकाराम धंदरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     आसन खुर्द शाळेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या