Ticker

6/recent/ticker-posts

शालेय शिक्षण अभ्यासक्रम आराखडा मसुदा अभिप्रायासाठी मुदत वाढवा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी


राकेश आसोले चित्रा न्युज 
मुंबई : शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2024 मध्ये मनुस्मृती आणि मनाचे श्लोक यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या मसुद्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी आणखी चार महिने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक विभागात चर्चा घडवून आणण्यासाठी अधिवेशन घ्यावे. शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून चर्चा करावी आणि शैक्षणिक आराखड्यातील त्रुटी दुरुस्त कराव्यात, या साठी कल्याण तहसील कार्यालय येथे शुक्रवारी सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण डोंबिवली महानगर कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. आपल्या मागणीचा लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून या वेळी देण्यात आले. या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा महासचिव राजू खरात, सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण डोंबिवली अध्यक्ष कमलेश उबाळे, नितीन कांबळे, आयटी प्रमुख, उपाध्यक्ष भाविका गवांदे, सदस्य राहुल अहिरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या