Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक भारती राज्य कार्यकारिणी बैठकीत अनेक ठराव मंजूर

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- शिक्षक भारती राज्य कार्यकारिणीची बैठक अलिकडेच मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव येथे शिक्षक भारती संस्थापक कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली. सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड,शिक्षक भारती राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, सुरेश देवकर, मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, प्राथमिक शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष विनोद कढव, प्रकाश ब्राम्हणकर, नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्राथमिक विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे, नाशिकचे विनोद रोकडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
                    या सभेमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विविध ठराव मंजूर करण्यात आले. यात प्रामुख्याने नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर आणि सर्व वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक-कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्य समन्वय समितीने पुकारलेल्या दि.२९ ऑगस्ट रोजी बेमुदत संपाला शिक्षक भारतीचा सक्रीय पाठिंबा, वर्ग ६ वी ते ८ वी वर शिकवणाऱ्या सर्व प्राथमिक पदवीधर/विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयाची अट शिथिल करण्यात यावी. १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत सातव्या वेतन आयोगात निर्माण झालेली वेतनत्रुटी वेतनवाढ  देऊन दूर करण्यात यावी,सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक)पद रद्द करावे. तसेच सद्या कार्यरत सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना २१ हजार रुपये मानधन देण्यात यावे,आंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षक पदाचा दर्जा मिळावा,खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करण्यात यावे,शिक्षणाचे व्यापारीकरण आणि कंपनीकरण बंद करावे,२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करु नये हे ठराव मंजूर करण्यात आले.
                      कला, क्रीडा, संगीत शिक्षकांना हद्दपार करु नये,संस्थांना वेतनेत्तर अनुदान व इमारत भाडे मागील थकबाकीसह विनाविलंब द्यावे. शिक्षण संस्थांना विजबिलात सवलत द्यावी,कस्तुरबा गांधी बालिका विद्यालया तील अंशकालीन शिक्षकांना पूर्णवेळ करण्यात यावे. आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करुन सेवेत कायम करा, राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करावा,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सावित्री-फातिमा कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना लागू करावी, मागेल त्या मान्यताप्राप्त शाळेस/संस्थेस विनाअनुदानित/कायम विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालये,व्यवसाय व तंत्रशिक्षण संस्था, रात्रशाळा आणि स्पेशल स्कूल्स् या सर्वांना विनाविलंब १०० टक्के वेतन अनुदान द्यावे.१०, २०, ३० आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याऱ्यांना विनाअट सरसकट लागू करावी, अंशतः अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक २०%, ४०%, ६०%, यांना सरसकट १००% अनुदानीत वेतन अदा करण्यात यावे राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाची सर्व रिक्त पदे भरण्यात यावी,अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयातील १०० रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी, अल्पसंख्याक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात पदभरती करताना ३०(१) कलमान्वये ना हरकत प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ नये, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावे या ठरावांचा समावेश आहे. बैठकीत विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या समस्या, विविध प्रश्न मांडले.उपस्थित पदाधिकाऱ्यांना अशोक बेलसरे, नवनाथ गेंड, सुभाष मोरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे संचालन राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी केले. आभार माजी राज्य कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी केले.बैठकीला प्राथमिक विभागीय सचिव शरद काकडे, भंडारा जिल्हा अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष भारत रेहपाडे, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष अरुण मुनघाटे, गोंदिया जिल्हा अध्यक्ष धम्मपाल गजभिये उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या