Ticker

6/recent/ticker-posts

चाळीसगाव येथील बस स्थानक परिसरात मोबाईल चोरणारा आरोपी चोरलेल्या मोबाईल सह चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात.


गणेश शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी

चाळीसगाव- चाळसीगाव शहरातील बस स्थानक परिसरात मोबाईल चोरणारा आरोपी चोरलेल्या मोबाईल सह चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून भारतीय न्याय संहिता 2023 नुसार आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.शहरातील बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या असलेल्या गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने समाधान भीमराव पाटील रा तांबोळे चाळीसगाव यांच्या मुलाच्या पँट च्या खिशातून साडेसात हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला असल्याची तक्रार पाटील यांनी शहर पोलिसांना दिली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी आरोपी अब्दुल समद अब्दुल रजा राहणार इजहार अशरफ नगर मालेगाव ताब्यात घेत चौकशी केली असता आरोपी जवळ चोरलेला मोबाईल मिळून आल्याने. त्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकदिवसीय पोलीस कोठडी आरोपीस दिली असून यापूर्वी देखील सदर आरोपीने नाशिक येथे मोबाईल चोरी केला असल्याचा त्यावर गुन्हा दाखल असून वरील गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या