• विविध प्रमाणपत्रांचे वितरण
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील मुख्यालयी सुशासन सप्ताह कालावधीत समाधान शिबिराचे आयोजन करण्याचे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्याने शनिवार(ता.२१ डिसेंबर) रोजी पोहरा महसूल मंडळातील ग्रामपंचायत कार्यालय पोहरा येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मानेगाव, चान्ना, पोहरा, पेंढरी व इसापूर तलाठी साझ्यातील गरजूंना उत्पन्नाचे प्रमाणपत्र-८, ई फेरफार-३१, राशन कार्ड-१, ७/१२-३६, नमुना ८अ-१४ व नकाशा-१ इत्यादी दाखले वाटप करण्यात आले. या शिबिरास बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शासन आपल्या दारी चे धर्तीवर १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यात समाधान शिबिराचे आयोजन करून जात, नॉन क्रिमीलेअर, अधिवास, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच आधारकार्ड तयार करणे, ई-फेरफार, राशन कार्ड व इतर दाखले देणे आणि आपले सरकार पोर्टल तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तहसील कार्यालय लाखनी व तालुका विधीसेवा प्राधिकरणाचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत पोहरा येथे सुशासन सप्ताहानिमित्त नायब तहसीलदार बी.आर. मडावी, मंडळ अधिकारी राकेश पंधरे, एम.आर. कारेमोरे मॅडम, अमर पारधी, वरिष्ठ सहाय्यक अवसरे, महा ईसेवा केंद्र चालक रामेंद्रकुमार लाडे, सरपंच रामलाल पाटणकर, कोतवाल आरजू सौदागर, रमेश वरठे, ग्रामपंचायत कर्मचारी आदेश खेडीकर उमराव गायधने, आशा सेविका अनिता गायधने, अधिवक्ता लिंगायत मॅडम, ॲड. के.एस. हुकरे मॅडम, कनिष्ठ लिपिक कुमारी सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. त्यात ग्रामस्थांना उत्पन्न प्रमाणपत्र, ई-फेरफार, राशन कार्ड, ७/१२, नमुना ८अ व नकाशा-१ इत्यादी दस्ताऐवज उपलब्ध करण्यात आले. यावेळी लालबहादुर दिघोरे, संकेत मेश्राम, ललित नगरकर, दिनेश वालोदे, कश्यप गणवीर, रतीराम उईके, रमाबाई बडोले यांचेसह बहुसंख्येने ग्रामवासी उपस्थित होते.
0 टिप्पण्या