Ticker

6/recent/ticker-posts

बाजार हंडरगुळीचा नाव माञ हाळीचे !!



चित्रा न्युज ब्युरो 
लातूर :-शतकाची परंपरा असलेला आणी निजाम राजवटी पासुन भरणारा गुरांचा बाजार उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावात भरत असतो.व नाव माञ पाच फुट अंतरावर असलेल्या हाळी या गावाचे. कारण,हाळी व हंडरगुळी या दोन गावासाठी तालुका, जिल्हा एकच असलेतरीही ग्रा.पं.सोसायटी, तलाठी हे कार्यालये वेगवेगळी. तसेच बाजारचे उत्पन्न हंडरगुळी गावाला.माञ हाळीकर असोत वा,हंडरगुळीकर असोत हाळीचा बाजार असेच म्हणत असतात.व बस प्रवासात हंडरगुळीकर असोत वा, हाळीकर असोत किंवा भारत देशाच्या विविध राज्यातुन बैलां— च्या खरेदी -विक्रीसाठी येणारे शेतकरी,व्यापारी असोत,हे पण तिकीट घेताना हाळी. हेच नाव घेतात.यामुळे बाजार जरी हंडरगुळी गावात भरत असला तरीही देशाच्या कानाकोप-यात हाळीचा बाजार या नावाने हाळी फेमस आहे.अशी अजब-गजब कथा आहे हंडरगुळी व हाळी या 2 गावांची.
विकास कामात हंडरगुळी टाॅपवर असल्याचे स्पष्टपणे दिसुन येते.उदा : गल्लोगल्ली रस्ते,गटारी,विज या सारख्या मुलभुत व पायाभुत सोई - सुविधा हंडरगुळी मध्ये आहेत.तर हाळीत फक्त पुढारी .. आणी विकास कामात .कारी..! अशी गत हाळीची बनलीय.अशी चर्चा हाळीकर करतात. आजवर तालुका, जिल्हापातळीवरील विविध पदं हाळीतील विविध पक्षातील व्यक्तींना मिळाले.तरीही सर्वांगिण विकासाच्या बाबतीत बोंबाबोंब!आजही अनेकजण घागरभर पाण्यासाठी राञंदिवस घडा घेऊन हंडरगुळीत येरजा-या करतात.व हे मोठमोठे असलेल्या पुढा-यांना शोभते का? असे प्रश्न उपस्थित करणारे हाळीकर जनता गावच्या पुढा-यांबद्दल एक ना धड, भाराभर चिंध्या!असे हंडरगुळीत पाणी भरताना म्हणत असतात.एकंदरीत दोन्ही गावातील विकास कामांची तुलना केली तर विकासाच्या बाबतीत हंडरगुळी टाॅपवर आहे आणी राहणारच!अशी चर्चा हाळीकर करतात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या