चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-दि 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान मोर्शी शहरांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आज 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन कुष्ठरोगाबाबत तपासणी करून माहिती घेणार आहे. याचा एकमेव उद्देश म्हणजे "लवकर निदान लवकर उपचार" हा आहे यामध्ये संशयित कुष्ठरोगाचे रुग्ण शोधून त्याची तपासणी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे केली जाणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करावे व माहिती द्यावी.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ मुळे ,डॉ बोबडे ,डॉ जैन मॅडम यांचे हस्ते महात्मा गांधीजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अधिपरिचारिका जयश्री मोरे यांनी कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेतली यावेळी रुग्णालयातील संपदा गटलेवार, वघारे सिस्टर, जावरकर सिस्टर, पाटील सिस्टर, कल्पना पंधरे, पुष्पा पंधरे, सुजाता पांडे, आशिष पाटील, विनय शेलुरे,प्रशांत बेहरे,शेख इसूफ, कृष्णा वाघमारे, पंकज पांडे, प्रकाश मंगळे,नंदू थोरात, सुधाकर कडू, दामले, नागोराव खडसे, नौशाद खान, श्रीराम नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी हजर होते.
0 टिप्पण्या