चित्रा न्युज ब्युरो
चामोर्शी: मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर चामोर्शी येथील जय बजरंग नाट्य कला मंडळ, संताजी नगर (गोंडपुरा) यांच्या सौजन्याने आणि सुयोग नाट्य रंगभूमी, वडसा यांच्या सादरीकरणातून संगीत रुसली हळद लग्नाची! या नाटकाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फित कापून या रंगमंचीय सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.
याचवेळी मा. खा.अशोकजी नेते यांच्या स्थानिक व विविध विकास निधीतून मंजूर ५० लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. या कामांमध्ये रंगमंच, बाथरूम, शौचालय, मुरूम खडीकरण, पुलिया बांधकाम, दोन सभागृह, व पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण यंत्र आदींचा समावेश होता.
या उद्घाटन सोहळ्यात मा.खा. अशोकजी नेते यांनी नाटकाच्या सामाजिक महत्त्वावर भाष्य करत म्हटले की, “नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. समाजाला सकारात्मक दिशा देण्याची क्षमता या माध्यमात आहे. मनोरंजनासोबतच उद्बोधन होईल, असे प्रयत्न नाट्यकलावंतांनी करायला हवेत.”
*विकासकामे: जनहिताचा विस्तार*
लोकार्पण सोहळ्यादरम्यान त्यांनी स्थानिक विकासकामांच्या यशस्वी पूर्ततेवर समाधान व्यक्त केले. “चामोर्शीतील नागरिकांसाठी माझ्या निधीतून ही कामे मंजूर केली आहेत. या भागातील नगरसेवक आशिषभाऊ पिपरे यांच्या प्रयत्नांमुळे विविध समस्या सोडवण्याचे काम शक्य झाले आहे. आशिषभाऊ यांच्या तडफदार नेतृत्वामुळे चामोर्शीतील विकासकामांना चालना मिळाली असून, या भागातील जनतेने त्यांच्या मागे खंबीर राहावे,” असे आवाहन मा.खा. अशोकजी नेते यांनी केले.
या नाटक सोहळ्याला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, समन्वयक प्रमोदजी पिपरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, सहकार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, नगरसेविका सोनालीताई पिपरे,संजयजी कुनघाडकर, मोरेश्वर कोठारे,वासेकर सर, सुभाष लटारे,उमाजी वासेकर, जिवन पिपरे,रविंद्र वासेकर, श्रीधर पेशंट्टीवार, तुळशीदास ( बंडू) नैताम ,नंदू पिपरे यांसह अनेक मान्यवर, नाट्यरसिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोफत नाटकाने नागरिकांमध्ये उत्साह
मकर संक्रांतीचे औचित्य साधून
संगीत रुसली हळद लग्नाची! या नाटकाचे मोफत सादरीकरण हे नागरिकांसाठी मोठे आकर्षण ठरले. मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या नाटकाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
आयोजकांचे अभिनंदन या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जय बजरंग नाट्य कला मंडळ व सर्व सहकाऱ्यांचे सर्व स्तरांवरून अभिनंदन करण्यात आले.
नाटक व लोकार्पण सोहळ्याच्या संगमातून चामोर्शीतील सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक कार्याला नवी ऊर्जा पसरल्याचे जाणवले.
“नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे आणि विकासकामांनी जीवनमान उंचावणे हेच या सोहळ्याचे यश आहे,” असे प्रतिपादन करत मा.खा. अशोकजी नेते यांनी या उपक्रमाचा समारोप केला.
0 टिप्पण्या