चित्रा न्युज ब्युरो
मेहकर : राजमाता मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप गवई यांनी प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले
की आदर्श राजमाता कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमाता माँ जिजाऊ यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये तलवारीच्या बळावर दडपशाहीला विरोध करण्याचे धाडस दाखविले. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांकडुन ते स्वप्न पुर्णत्वास देखील नेले. माँ.जिजाऊंनी शिवरायांच्या हृदयात स्वराज्य प्रेम रुजविले. हिंदवी स्वराज्याचे महत्व सांगीतले. राजामाता माँ जिजाऊ यांचे कार्य आणि व्यक्तीमत्व महिलांना प्रेरणा देणारे आहे आणी तसेच स्वामी विवेकानंद यांचे तेजस्वी विचार उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका. स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. स्वतःचा विकास करा. आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. आसे विचार स्वामी विवेकानंद यांचे युवकांसाठी प्रेरणा देणारे आहे. असे प्रतिपादन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिप गवई यांनी केले.
यावेळी तथागत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, आयटी सेल सोशल मीडिया अध्यक्ष राधेश्याम खरात, महिला आघाडी राष्ट्रीय सचिव कांचन मोरे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष उषा सगट, खामगांव तालुका अध्यक्ष आम्रपाली गवई, खामगांव शहर अध्यक्ष विशाखा ठोसरे, दिक्षा गवई, समृद्धी गायकवाड, लता गायकवाड, ललीता निकाळजे, रोशनी गायकवाड, लता निकाळजे, दिक्षा जमधाडे, रेखा गवई समस्त तथागत ग्रुप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या