चित्रा न्युज ब्युरो
लातूर :-उदगीर तालुक्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणुन येथील तिरु मध्यम प्रकल्पाची ओळख आहे.आणि हा प्रकल्प गत पावसाळ्यात पाण्याने तुडूंब भरला आहे.परिणामी प्रकल्पा- वर विसंबुन असलेल्या गावातील नळांना मुबलक पाणी येत असल्याने आमआदमीच्या चेह-यावर सध्यातरी समाधानाचे भाव दिसतात.
कारण,गत कांही दिवसापासुन याच प्रकल्पातील पाण्याचा बेसुमार अवैध उपसा होत असल्याने उन्हाळ्यामध्ये हाळी-हंडरगुळीसह परिसरातील लहान-मोठ्या गावांना पाणी टंचाई भेडसावणार!अशी भिती जाणकार व्यक्त करीत आहेत.तेंव्हा संबंधित प्रशासनाने "बघ्याची" भुमिका न घेता विनापरवाना पाण्याचा बेसुमार करणा-यांची मोटार,वायर व स्टार्टर जप्त करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हाळी परिसराची आहे. शिरुर ताजबंद,हाळी,हंडरगुळी, शिवनखेड,चिमाचीवाडी,वाढवणा 2 या व अन्य 52 गावांना व शेतीला पाणी पुरवठा करणारा तिरु मध्यम प्रकल्प हा गत पावसाळ्यात तुडूंब भरला असल्याने कांही शेतक-यानी तलावातुन पाईप लाईन करुन पाणी देत असल्याने शिवार हिरवागार दिसत आहे.तसेच पिकांना पाणी देण्याबरोबरच कांहीजण शेतातील विहीरीमध्ये पाणी भरुन घेतात.ते ही विनापरवाना.तेंव्हा अशा शेतक-यांस विज जोडणी नसतानाही कांही धन दांडगे व दांड प्रव्रत्तीच्या शेतक-यांनी आकडे टाकुन राञंदिवस मोटारीच्या साह्याने पाण्याचा बेसुमार उपसा करीत असल्याची कुजबूज तलावा शेजारी असलेल्या गरीब शेतकरी बांधवांमधुन ऐकू येत आहे.
अशाप्रकारे सध्या होत असलेल्या अवैध व बेसुमार उपस्यामुळे येत्या उन्हाळ्यात "धरण उशाला,कोरड घशाला" अशी गत होऊ शकते.अशी भीती जाणकार व्यक्त करतात.
उन्हाळ्यात उद् भवणा-या टंचाईवर लाखों-करोडों रुपये खर्च करण्या — ऐवजी आतापासुनच अशा अवैध व आकडे टाकुन विद्युत मोटारी लावुन बेसुमार पाणी उपसणा-या धनदांडगे शेतक-यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. *पाणी वाहते व पांदन भरुन जाते* असे चिञ अनेक शिवारात दिसते.कारण अनेक शेतकरी अवैध आकडे टाकुन विजकनेक्शन घेतात व राञंदिवस पाण्याचा बेसुमार उपसा करतात.तसेच पिकांचे वाफे, दांड भरभरुन पाणी वाहुन जाते.तरी ही हे पाणी बंद करत नाहीत.यामुळे अनेक ठिकाणच्या शेतरस्त्यावर चिखलाचा डेरा तयार होतो.आणी या चिखलातुन वाट काढताना जीव मुठीत घेऊन ये-जा करावे लागते.. प्रत्येक सार्वजनिक पाण्याच्या स्ञोतावरुन गावोगावी पाण्याची सोय केली जाते.त्यासाठी अशा जागी विहिरी खोदल्या जातात.अण् वाहणारे पाणी त्या विहिरीत साचते. तरी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महसुल व वीज खात्याने तिरु मध्यम प्रकल्प परिसराची पाहणी केल्यास असंख्य मोटारी आकडे टाकुन वीज वापरीत व पाणी उपसा करीत असल्याचे सापडू शकतात.अशी कुजबूज प्रकल्पालगतचे कांही गरीब शेतकरीबांधवातुन ऐकू येत आहे ..
0 टिप्पण्या