Ticker

6/recent/ticker-posts

थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन...


चित्रा न्युज ब्युरो
नांदेड :-बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथे थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.महाविद्यालयातील विद्यार्थी,युवक-युवती, सर्वांनी रक्तदान करून स्मृतीशेष बळीराम पाटील यांना आभीवादन करावे. बळीराम पाटील यांना स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश सरकारने 
त्यांना पाटील ही पदवी बहाल केली.हे बंजारा समाजाचे भूषण  आहेत. मुळचे विदर्भातील महगुळी गावचे पण ते किनवट येथील मांडवी गावात स्थायिक झाले.तत्कालीन ब्रिटिश सरकारने इजारदार म्हणून पाटील ही पदवी बहाल केली. व इजारीमध्ये 1000 एकर जमीन ब्रिटिश सरकार ने दान दिली. 
ही संपत्ती त्यांनी त्या भागातील समाजाला वाटप करून आदर्श मांडवी गावाची स्थापना केली.बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी आपले संपूर्ण जीवन खर्च केले.  त्या काळात सामाजिक  सांस्कृतिक , साहित्यिक,आर्थिक विकास कार्य केले.दोन मराठी भाषेत ग्रंथ लिहिले 'गोर बंजारा समाजाचा इतिहास' या  व दुसरा ग्रंथ 'आलेख समाज प्रगतीचा ' या ग्रंथाचा  हिंदी व भारतीय भाषेत अनुवाद झाला आहे. हे दोन्ही ग्रंथ समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या विचार व कार्याचा वसा व वारसा त्यांचे पुत्र माजी खासदार उत्कृष्ट संसदपटु माजी महसूल मंत्री उत्तमरावजी राठोड यांनी चालवला.त्यांनी बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी व विकासा साठी कार्य केले आहे. किनवट सारख्या 
अती दुर्गम भागातील वंचित उपेक्षित समाजांच्या मुलांना शिक्षणासाठी बळीराम पाटील महाविद्यालयाची स्थापना केली.
 हे महाविद्यालय वटवृक्षात रूपांतर झाले. महाविद्यालयाची मोठी परंपरा आहे देश विदेशात महाविद्यालयाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत नोकरी करत आहेत.
    थोर समाज सुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांचा 17 जानेवारी रोजी स्मृर्ती दिवस आहे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विचार व कार्याला अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयात मोठे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्वांनी रक्तदान करावे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. ज्ञानदान, नेत्रदान ,अन्नदान, गोदान असे वेगवेगळे दान केले जात असतात त्यामध्ये रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचतो. रक्तदान केल्यामुळे गरोदर माता. अपघात गंभीर आजारी रुग्ण यांना रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे रक्तपेढीमध्ये रक्त साठा पूरेसा नसतो त्यामुळे डॉक्टर रुग्णाचा प्राण वाचू शकत नाहीत त्याची प्रचिती आपण covid-19 च्या काळात पाहिली आहे. रक्तासाठी भटकंती करावी लागली आहे त्यामुळे महाविद्यालयाने रक्तदानाची प्रदीर्घ परंपरा कित्येक वर्षापासून अखंड  निरंतर चालू ठेवली आहे. कोवीड काळात सुद्धा खंड पडू न देता आतापर्यंत कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय जिल्हा रुग्णालय विष्णुपुरी नांदेड संस्थेला हजारो रक्ताच्या बॅगा दिल्या आहेत हजारो लोकांना जीवदान देण्याचे भाग्य आमच्या महाविद्यालयास लाभले आहे रक्तदान हे कार्य राष्ट्रीय कार्य आहे याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजने विभागाच्या वतीने कार्यक्रमाधिकारी या नात्याने मी प्रा. शेषराव माने राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक , स्वयंसेविका प्राध्यापक , कर्मचारी समाजातील नागरिक समाजसेवक युवक -युवती सर्वांनी मिळून रक्तदान कार्यात सहभागी व्हावे रक्तदान केल्याने कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत 48 तासात रक्तपुरवठा  पूर्ववत तयार होतो. ज्याची 18 वर्षे पूर्ण झाले आणि  वजन 50 किलो ग्राम पेक्षा जास्त असेल अशांना रक्तदान करता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या