लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :- हिमायतनगर शहरातील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक व ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती हिमायतनगर यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा 2025 निमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन परमेश्वर मंदिरासमोर करण्यात आले आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4 ते 10 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे. तसेच दिनांक 4 मार्च 2025 रोजी ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरि कीर्तन सायंकाळी 5 ते 9 या वेळेत बस स्टॅन्ड हिमायतनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त जणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती हिमायतनगरच्या संयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या