Ticker

6/recent/ticker-posts

तात्काळ विज जोडणी द्या अन्यथा व्याज द्या


 शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सहन करणार नाही. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा इशारा 

चित्रा न्युज प्रतिनिधी  
भद्रावती : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणीसाठी महावितरण आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. २०१८ पासून शेतकऱ्यांकडून घेतलेल्या सुरक्षारकमेवर व्याज द्या अथवा त्वरित वीज जोडणी द्या, अन्यथा शेतकऱ्यांसह महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल १५९० शेतकऱ्यांनी २०१८ पासून कृषी पंपांसाठी अर्ज केले होते. त्यासाठी महावितरणने सुरक्षारक्कम घेतली मात्र अद्याप वीज जोडणी दिलेली नाही. शेतीसाठी अवलंबून असलेल्या या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशातच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी सरकारला जाहीर इशारा देत वीज जोडणीसाठी त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे.

*धानोरकर यांनी मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलेले स्मरणपत्र*

महावितरणकडून घरगुती ग्राहकांकडून विज बिल भरण्यास उशीर झाला तर व्याज आकारले जाते. मग शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच धोरण का नाही? असा सवाल धानोरकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या सुरक्षारकमेवर सरकारने व्याज का दिले नाही? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेतही उपस्थित केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या