Ticker

6/recent/ticker-posts

दुर्गापूर येथे भक्तिरसात न्हालेला अखंड महानाम संकीर्तनम आणि अन्नभोग महोत्सवात मा.खा.अशोकजी नेते यांची उपस्थिती..



चित्रा न्युज प्रतिनिधी
गडचिरोली :-श्री. श्री. राधामाधव सार्वजनिक सेवा समितीच्या वतीने दुर्गापूर येथे अखंड महानाम संकीर्तनम तथा अन्नभोग महोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. या पवित्र धार्मिक सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून भगवान श्री राधा-कृष्णाचे दर्शन घेतले.

यावेळी मा.खा. अशोकजी नेते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः हातात महाप्रसाद घेऊन भक्तांना वाटप केला. त्यांचा हा भावनापूर्ण सेवाभाव उपस्थित भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.

या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने मा.खा. अशोकजी नेते यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या भव्य उत्सवाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, तालुका महामंत्री विनोद गौरकर, भाजपा बंगाली आघाडीचे नेते दुलालजी मंडल, कार्तिक गाईन, देवब्रत रॉय, तसेच प्रभुजी तरुण महाराज, कृष्णकांत सुमंत मंडल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संपूर्ण दुर्गापूर या भक्तिरसात न्हालेल्या महोत्सवाने श्रीराधा-कृष्ण भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभूती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या