चित्रा न्युज प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :-ग्रुप ग्रामपंचायत मावसगव्हाण ता पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर.कार्यालयात महाआवास अभियानांतर्गत ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षातर्फे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनमध्ये निवड झालेल्या 90 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते मंजूर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण गव्हाणे, सरपंच सौ रुख्मन बाई विठ्ठल शिंदे, ग्राम.प.सदस्य प्रकाश जाधव, ज्ञाने श्र्वर तेजींकर,विजय केदारे,हसन शेख, उमाकांत जाधव कृष्णा तेजीनकर महेश शिरवत पदाधिकारी, सदस्य, आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या