Ticker

6/recent/ticker-posts

सुकणी जवळ राज्यमार्गावर पडलाय"मौत का खड्डा"

चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-नांदेड-बिदर या राज्यमार्गाच्या दोन्ही बाजुनी वसलेल्या सुकणी या गावा जवळ असलेल्या पुल्यावर मागील कित्येक दिवसापासुन भला मोठा खड्डा पडला आहे.आणि या खड्ड्या मध्ये आदळुन लहान-मोठ्या वाहनां - चे व त्या वाहनांतील प्रवाशांचे पार्ट निकामी होत आहेत.तसेच उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर कांही दिवसा पुर्वी येथेच पलटी झाले होते.सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.माञ, कधी काय होईल! याचा नेम नाही.म्हणुन संबंधित विभागाने याची दखल घ्यावी,अशी वाहनधारकांसह सुकनी येथील जनतेची मागणी आहे.
*विद्युत डि.पी.जवळ आदळ_ आपट याची दुरुस्ती करावी झटपट* सुकणी येथील मरिआई मंदीरा पुढे व उदगीरकडून येताना राज्यमार्गालगत असलेल्या विद्युत डि.पी.पासुन कांही महिण्यापुर्वीच नव्याने बनवलेल्या सिमेंट रोडचे काम चुकीच्या पध्दतीने केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.कारण,सुकणी गावातुन गेलेल्या राज्यमार्गावरचा छोटासा रस्ता सिमेंटचा बनवला असलातरी ही विद्युत डि.पी.जवळ हा रोड व्यवस्थित पुर्ण न करताच अर्धवट सोडून ठेकेदार रफ्फूचक्कर झाला आहे.अगदी असाच प्रकार त्या पुलावरील खड्याच्या बाबतीत घडला आहे.आणि हे दोन्ही "स्पाॅट" खुपच "डेंजर" आहेत.आणि येथे दुर्देवाने एखादा अपघात झाला तर मग माञ प्राणहानी होऊ शकते!आणि नेमके याचीच वाट संबंधित अधिकारी बघत आहेत!की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
कारण,या बद्दल पेपरबाजी करुन व माहिती देऊन ही संबंधित अधिकारी कांहीच हालचाल करीत नाहीत. यामुळे एखादा अपघात व्हायची वाट तर संबंधित अधिकारी बघत नाही ना असा संतप्त सवाल सुकणीकर व वाहनधारकांमधुन चर्चीला जातोय. तेंव्हा नव्याने बनवलेल्या सिमेंट रोड वरुन होणारी आदळ-आपट कायम- ची बंद कधी होणार?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या