चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : चंद्रपूर जिल्हा तिरळे कुणबी समाजातफे्र दिनांक १९ फेब्रुवारी, २०२५ रोजी विवेक टायपिंग इंस्टीटयुट दे.गो. तुकूम, चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
या समारंभाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार तिरळे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांचे हस्ते करण्यात आले. या शिवजयंती कार्यक्रमाला तिरळे कुणबी समाजाचे सचिव गजानन चौधरी, भद्रावती तालुकाध्यक्ष वसंतराव मानकर, सचिव विनोद राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वामनरावजी गायकवाड, कवडूजी वैद्य, नितीन देकरे, सुनिल काळे, विवेक देकरे, सतिश विटेकर, किशोर धोटे व समाजाचे असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या