Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे कार्य पाहून प्रेरणा मिळते - तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिप गवई

चित्रा न्युज प्रतिनिधी
मेहकर : तथागत ग्रुपच्या वतिने मेहकर येथे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  करण्यात आले व संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली  यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणांत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक
अध्यक्ष संदिप गवई म्हणाले की, थोर समाजसुधारक महाराष्ट्राच्या भूमीतील महान संत, किर्तनकार, ग्रामस्वच्छतेचे पुरस्कर्ते, कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे कार्य पाहून यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली व कुठलेही कर्म हे लहान किंवा मोठे नसते, त्या कार्याला आपण किती योगदान देतो, त्यावर त्या कार्याची उंची ठरते. अज्ञान, अंधश्रद्धा, आणि अस्वच्छतेने बुरसटलेल्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करनारे दगडात देव नाही हे पटवून देणारे थोर समाजसुधारक महाराष्ट्राच्या भूमीतील महान संत, किर्तनकार, ग्रामस्वच्छतेचे पुरस्कर्ते, कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज त्यांची जयंती आपण मोठ्या आनंदात व अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राववून साजरी करत आहोत. त्यांची जयंती केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण रोज करून समाजात त्या स्वरूपाचं काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी आसे प्रतिपादन केले..

यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या