चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे ; - रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुग्ण हक्क परिषद या संघटनेतर्फे शिव सन्मान पुरस्कार- 2025 या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण होते तर माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, रुग्ण हक्क परिषदेचे इकबालभाई शेख, अजय विरकर, राहुल हुलावळे, युनिव्हर्सल हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनंत बागुल प्रमुख उपस्थित होते.
राजकीय, सामाजिक, विधी व वैद्यकीय, पत्रकारिता, उद्योजकता, कला, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात आपले मौलिक योगदान देणाऱ्या १०१ सुप्रसिद्ध धूरनिंना शिवसन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी शीतल बालवडकर, बाळासाहेब निकाळजे, बाळासाहेब जेधे, प्रदीप खाडे, विजयकुमार गायकवाड, डॉ. स्मिता भोयार, डॉ. अमोघ भांडारकर, डॉ. सुनील साळवे, डॉ. विशाल हेंड, डॉ. जयंत सूर्यगंध, डॉ. विलासकुमार बाफना, रुग्ण हक्क परिषदेचे सुरेश फाले, रेखा वाघमारे, प्रा. राजा सोनकांबळे, मंदा साठे, गौरव कदम, अनिल पुटगे, ऍड. विराज करचे, ऍड. विद्या शिंदे, ऍड. रमेश राठोड, ऍड. नीलिमा दिघे, ऍड. निलेश फडतरे, ऍड. आम्रपाली धीवार, ऍड. पूजा भोसले, ऍड. गीता निकाळजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवानी माळवदकर, प्राची खैरे, कवी सिताराम नरके, दैनिक राष्ट्रसंचारच्या संपादकीय विभागाच्या सारीका रोजेकर आदींसह १०१ महत्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांना शिवसन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
शिवसन्मान पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे बारावे वर्ष होते. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू लाल महल या ठिकाणी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी संयोजन रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, रेश्मा जांभळे, प्रभा अवलेलू, कविता डाडर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी तर आभार महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय आल्हाट यांनी मानले.
अधिक माहितीसाठी - 8956185702
0 टिप्पण्या