१८० उपवर मुला मुलींनी दिला परिचय
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : भद्रावती तालुका तिरळे कुणबी समाज सेवा संघाच्या वतीने स्थानिक श्री मंगल कार्यालय येथे तिरळे कुणबी समाजाचा विदर्भस्तरिय मेळावा व उपवर वधुंचा परिचय मेळावा मोठ्या थाटात नुकताच पार पडला.
या मेळाव्याचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर यांचे हस्ते द्वीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा तिरळे कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र वैद्य हे होते.याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून रविंद्र शिंदे ,प्रमुख वक्ते व प्रबोधनकार प्रविण देशमुख यवतमाळ तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश गुडधे पाटील नागपुर, नरेंद्र ठाकरे, सुरेखा देशमुख हिंगणघाट, लहसिलदार पल्लवी आखरे, चंद्रपुर हे प्रामुख्याने उपस्थित होते.या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.सोबतच मान्यवरांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले.त्यानंतर समाजातील १८० उपवर - वधुंनी आपला परिचय दिला.या मेळाव्यात विदर्भातील समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभाग दर्शविला.शेवटी स्वरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन अमोल दौलतकर यांनी,संचालन शंकर मिरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत बुरानकर यांनी मानले.या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे प्रमुख वसंता मानकर,छत्रपती राऊत, उपप्रमुख मोहण पवार,कृष्णा इंगळे,अमोल गावंडे,रवी देऊरकर, प्रणय पवार, विजय भोयर, ओंकार मोघे, पांडुरंग इंगळे, प्रशांत तुराणकर, चेलन कोंबे, प्रविन निकम,उज्वला वानखेडे, विद्या मोघे, सोनाली गावंडे,सुवर्णा दौलतकर,विनोद राऊत,बाळू भोयर
आदींनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या