Ticker

6/recent/ticker-posts

माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती तथागत ग्रुपच्यावतिने उत्साहात साजरी

चित्रा न्युज प्रतिनिधी
बुलढाणा :-मेहकर तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्यावतिने जनसंपर्क कार्यालय मेहकर येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आपल्या छोट्याखानी भाषणातून सांगितले की, आई तुझ्या त्यागावानी, त्याग कुणी करणार नाही स्वतःच कुंकू सोपवलं, तू समाजाच्यासाठी, तशी हिम्मत आता कुणात उरलेली नाही बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे पाठिंबा देणाऱ्या व त्यांना सदैव प्रेरणा आणि लढण्याची हिम्मत देणाऱ्या त्यागमुर्तीच्या 'प्रतीक माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महिलांना प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या