Ticker

6/recent/ticker-posts

मौसम है मस्ताना,पाऊस पडतोय मे महिना असताना..!


हंडरगुळी परिसरात पाऊस घालतोय
मान्सूनपूर्व शेतीकामांत आडफाटा!!

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 लातूर :-मौसम है मस्ताना,पाऊस पडतोय मे महिना असताना या वाक्याचा तंतोतंत अनुभव गत १० दिवसापासून हाळी-हंडरगुळी परिसरातील सर्व नागरीक घेतात.
कारण,दि.११ मे पासून ते दि.२० मे पर्यंत निर्सगाने ञिनेञ उघडल्याचे पहावयास मिळते.म्हणुन कधी वारा तर कधी अंगातून वाहतात घामाच्या धारा तर कधी अवकाळी पावसाचा मारा..!
अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले असून गरज नसताना पडणारा पाऊस गरज असताना ऐन मोसमात पडणार का,गायब होणार! याबद्दल नानाविध प्रकारच्या चर्चा सुरु आहेत  २०२५-२६ चा खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे मान्सूनपूर्व शेतीकामांना गती आली होती.पण गत १० दिवसा पासून वादळीवारे,कडाडणारी वीज व मोठ्याने गडगड करणारे आभाळ अशा भेसूर वातावरणात अवकाळी पावसाने कहर केला आहे.म्हणुन या परिसरातील मान्सूनपूर्व शेतीकामांत आडकाठी आणण्याचे काम अवेळी पडत असलेल्या पावसाने केले आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने कहर केला आहे.अगदी तसाच कहर हंडरगुळी परिसातील गावात केला असून सलग दुस-या आठवड्यातही हा कहर कायम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या