सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या निदर्शनास येताच स्थानिक जनता व जेसीबीच्या मदतीने वाहतूक सुरळीत
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -आज दिनांक 20 मे 2025 ला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे भंडारा ते पवनी महामार्गावर खापा जंगल व वाकेश्वर फाटा येथे झाडे पडून वाहतुकीस कोंडी निर्माण झाली होती .अड्याळ पोस्ट स्टेशनचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक धनंजय पाटील यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात येतात स्थानिक लोकांच्या मदतीने व जेसीबीच्या सहाय्याने झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
0 टिप्पण्या