Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक पर्यावरणदिनी "हरित नांदेड" अभियानास सुरुवात


"वृक्षलागवडीसाठी महानगरपालिका, सामाजिक संस्था व वृक्षमित्र फाउंडेशनचा पुढाकार"

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन महापालिकेच्या विसावा उद्यान येथील आयोजित कार्यक्रमात "हरित नांदेड" अभियानास सुरुवात करण्यात आली. या *कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन गुरुव्दारा लंगर साहिबचे श्री बाबा हरीसिंघजी तर प्रमुख अतिथी म्हणुन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे व उपवनसंरक्षक केशव वाबळे* यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विविध सामाजिक संस्था व वृक्षमित्र फाउंडेशनचे प्रतिनिधी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नांदेड महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मागील सात वर्षापासुन लोकसहभागातुन वृक्ष लागवड संगोपनाचे कार्य सुरु असुन मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतुन "हरित नांदेड" उपक्रमा अंतर्गत २०२४ च्या मान्सुन मध्ये महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा हद्दीत एकुण २६००० वृक्ष लागवड करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दिनांक ५ जुन रोजी विसावा उद्यान येथे वृक्षरोपण करुन करण्यात आली आहे.

नांदेड शहराचे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था एकवटल्या असुन नियोजनबध्द कार्यक्रमातुन वृक्षांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासन, वृक्षमित्र फाउंडेशन, गुरुव्दारा लंबर साहेब व शहरातील विविध सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. या सर्वांच्या पुढाकाराने व सहकार्याने हरित नांदेड हे अभियान यशस्वी करण्यात येणार असुन या अभियानाची सुरुवात विसावा उद्यान येथे प्रातिनिधीक स्वरुपात वृक्षारोणन करुन करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात शहरातील विविध भागात वृक्षरोपण करुन लागवड करण्यात आलेले वृक्ष जोपासण्याच्या दृष्टीकोणातुन सामाजिक संघटने मार्फत ट्री गार्ड, ठिबक सिंचन, तार फेंसिंग इत्यादी आवश्यक बाबींची पुर्तता केली जाणार आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आजमितीस शहरामध्ये मनपा हद्दीत यावर्षी वृक्षगणना करण्यात आली असून शहरामध्ये आज रोजी केवळ ३.१० लक्ष झाडे अस्तित्वात असून आजमितीस शहरातील ८.०० लक्ष लोकसंख्या विचारात घेता आज आपण "एक व्यक्ती एक झाड" याप्रमाणे सुध्दा पुर्तता करण्यास कमी पडलो असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे नमुद करुन शहरातील पर्यावरणप्रेमी व सुजान नागरीकांनी हरित नांदेड अभियानात जास्तीत जास्त सहभाग घेऊन सदरील अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले आहे.

या कार्यक्रमास प्र.अतिरिक्त आयुक्त तथा उपआयुक्त सुप्रिया टवलारे, उपआयुक्त नितीन गाढवे, वनपरिक्षेत्रिय अधिकारी चव्हाण, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादीक, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, रमेश चवरे, राजेश जाधव यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी हरित नांदेड अभियाना संदर्भात महानगरपालिकेच्या नियोजनाची भुमिका व प्रास्ताविक उद्यान अधिक्षक डॉ.फरहतुल्ला बेग यांनी केले, उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ ब्रम्हकुमारी स्वाती बहेनजी यांनी दिली तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर यांनी केले.

या अभियानामध्ये सामाजिक संस्था वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, रोटरी क्लबचे, वासवी क्लब, गोदावरी नदी संसद, ऑल इंडीया रिन्युवेबल एनर्जि असो., नांदेड जनरल ट्रेडर्स असोसिएशन, लॉयन्स प्राईड नांदेड, मेथेडिस्ट मेन्स-मेथेडिस्ट चर्च, श्री दत्तकृपा सेवाभावी संस्था वाघाळा, महाराष्ट्र आर्यवैश्य महिला महासभा, राऊ प्रतिष्ठाण हडको, ज्ञान संवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ धुप्पा, नायगाव, अग्रवाल महिला मंडळ, श्री संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था, ब्रम्हकुमारीज वसंतनगर, गार्गी संस्कार केंद्र, नांदेड ब्लॉगर्स ग्रुप, मातृसेवा संघ, नांदेड, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुल, आर्य वैश्य शिक्षक संघ, अग्रसेन समिती, नांदेड, फिंगर प्रिंट प्रि स्कूल, लायन्स क्लब एंजल्स, नांदेड इत्यादी संस्था सक्रिय सहभागी असणार आहेत,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या