हिंगोली ग्रामीण प्रतिनिधी - श्रीकांत बारहाते
हिंगोली :-सध्या चालू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न वसमत तालुक्यातील गिरगाव व परिसरातील शेतकरी वर्गांच्या ऐन ऐरणीवर येऊन थेट ते उदरनिर्वाहाच्या अगदीच निकट येऊन तळ ठोकून उभा असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारुन उदरनिर्वाह उपजीविकेचा सवाल खडा केला गेला आहे.
शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या गिरगावातील सुपीक व बागायती शेतजमीन नष्ट होत आहेत, शेती व शेतकरी उध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्हास मान्य नाही. अनेक अल्पभूधारक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होत आहेत, त्यामुळे आमच्या उपजीवीहिकेची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. हा महामार्ग पर्यावरण विश्वंसक असल्यामुळे भविष्यात गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. असे प्रश्न यावेळी शेतकरी बांधवांनी सरकारच्या पश्चात सवाल उपस्थित केले आहेत. ते पुढे निवेदनात असेही म्हणाले की,
बाधित शेतकऱ्यांन सोबत पूर्ण ग्रामस्थांचा या महामार्गाला विरोध असल्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा अशी बहुसंख्याकी मागणी शेतकरी बांधव महिला वर्गांच्या वतीने या वेळी करण्यात आली आहे. ते पुढे असे ही म्हणाले, की आमच्या एकमुखी मागणीची दखल घेत भूसंपादन प्रक्रिया थांबवावी आणि हा शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा व आमच्या भावना या निवेदना मार्फत शासना पर्यंत पोहचाव्या असं वक्तव्य त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केलं गेलं तर या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मंडळ अधिकारी, तलाठी कर्मचारी, पोलीस पाटील, गाव प्रतिनिधी तसेच संरक्षणा अर्थि कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस प्रशासन पथक या वेळी तैनात होते. तर यावेळी मंडळ अधिकारी यांना निवेदन देऊन निवेदनावर शेकडो शेतकरी बांधव महिला वर्ग व अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या