सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- १ ऑगस्ट महसूल दिना निम्मित्त उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात येते.याच निम्मित्त पोलीस पाटील अमोल गायकवाड यांनी केलेल्या महसूल विभाग निगडीत सेवा बद्दल गावामध्ये शेतकरी वर्गासाठी जिवंत सातबारा मोहीम, ऍग्रो स्टार, फार्मर आयडी,गावात घेतलेले महसूल प्रशासनाचे कॅम्प तसेच लाडकी बहीण योजना , वयोश्री योजना, विधवा पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना बद्दल जनजागृती करणे व गावातील रस्ता केसेस , निवडणूक व प्रशासकीय स्तरावर स्तरावरील केलेली मदत तसेच महसूल विभागाची वेगवेगळी कामे केली याची दखल घेऊन आदर्श पोलीस पाटील म्हणून कर्जत उपविभागाचे प्रांत अधिकारी पाटील साहेब व तहसीलदार पाडळे साहेब यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
आदर्श पोलीस पाटील मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मंडळ अधिकारी शिरसाठ,पोलीस पाटील अध्यक्ष योगीनाथ जायभाय पाटील, दत्तात्रय मोरे पाटील , निलेश वाघ, महादेव वराट , कल्याण जगदाळे, श्रीपाद देशमुख , संतोष उगले शिऊर सरपंच गौतम उतेकर , भगवान देवकाते, उपसरपंच आजिनाथ निकम व जामखेड तालुका राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले.
0 टिप्पण्या