चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-तथागत विद्यालय, केसलवाडा तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे 2025 -26 या वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली. निवडणूक कशी असते, काय करावे लागते,ती प्रक्रिया घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारे ते पार पडले जाते हे विद्यार्थ्यांना कळावे या हेतूने विद्यालयात दिनांक 28 जुलैला शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली.
विद्यार्थ्यांना चिन्ह देण्यात आली आणि अत्याधुनिक पद्धतीने ईव्हीएम कार्य कसे करते हे प्रत्यक्षरीत्या करून निवडणूक घेण्यात आली. मतदान केंद्राध्यक्ष नितीन बारसागडे व मतदान अधिकारी1 नयन खेकडे,2 क्रिश कुरझेकर 3 हिमांशु गजभिये यांनी उत्तम रीतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडली यामध्ये
विद्यार्थी प्रतिनिधी:
अयुर भगवान मलोडे
विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. सानिया सतीश गजभिये
विज्ञान प्रतिनिधी:
कु.पुनम राहुल वाहने
सांस्कृतिक प्रमुख:
कु नव्या भाऊराव भानारकर क्रीडा व आरोग्य प्रमुख
नैतिक वाल्मीक आरीकर
सहल प्रमुख:
कु.धनश्री सुरेश मरघडे
यांची निवड मुलांनी प्रत्येक्ष मतदानाने केली व पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले.
या कार्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मुलांना प्रोत्साहित केले आणि त्यांना निवडणूक प्रक्रिया विषयी समजावून आपल्या देखरेखीखाली करून घेतले. या कार्याला उत्तम सहकार्य शिक्षक श्री. धनराज भोयर, प्रदीप गोंडाने, रोहित फेंडर सर,सुषमा गजभिये, हटवार मॅडम व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पद्माकर सावरकर यांनी संपूर्ण नियोजन कार्यावर देखरेख ठेवून सहकार्य करून अतिशय शांततेत वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली.
0 टिप्पण्या