Ticker

6/recent/ticker-posts

"पावरा" जातीत "पाटील" ची घुसखोरी; शहादा तालुक्यातील वाघर्डे येथील प्रकरण


बिरसा फायटर्सची जिल्हाधिका-यांकडे कारवाईची मागणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 नंदूरबार : शाळेच्या दाखल्यावर,वंशावळ व जातीच्या दाखल्यावर "पाटील" जातीची नोंद असतांना "पावरा" जातीची काही कागदपत्रांत नोंद करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खोट्या दस्तऐवजांच्या आधारे  मिळवून नोकरीत व शासनाच्या विविध योजनांत आरक्षणाचा गैरफायदा घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणा-या चुनिलाल दगा जाधव व त्यांचे रक्त नात्यातील व्यक्तींनी  राहणार वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्यावर महाराष्ट्र अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती ,इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन)अधिनियम २००० चे कलम १० व १२ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,हाना पटले,नारसिंग वसावे, सखाराम मोते,कैलास पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   "पाटील" ही जात अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच आदिवासीमध्ये समाविष्ट नाही.राष्ट्रपती महोदयांनी अनुसूचित जमातीकरिता घोषित केलेल्या प्रेसिडेंटल ऑर्डर मध्ये पाटील जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश नाही.चुनिलाल दगा जाधव यांच्या जिल्हा परिषद शाळा वाघर्डे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दिनांक १७ ऑक्टोबर २०१९ रोजीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जात "पाटील" अशी स्पष्ट नोंद करण्यात आलेली आहे.चुनिलाल दगा जाधव यांनी दिनांक २६ /७/२०२७ रोजी  अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदूरबार समोर माझी मुलगी शितल चुनिलाल जाधव व मुलगा प्रदिप चुनिलाल जाधव या दोन्ही मुलांचे नस्ती मधील जोडलेले जात प्रमाणपत्र आपल्या कार्यालयात जमा करून घ्यावे व यापुढे मी कोणत्याही प्रकारे "पावरा" या जातीच्या आधारावर कोठेही दावा सांगणार नाही,असे समक्ष लिहून दिले आहे,लेखी जबाब नोंदवला आहे.
                           सत्तर दगा पाटील  वडील- जातीची नोंद हिंदू पाटील, शांताबाई दगा पाटील आत्या- जातीची नोंद हिंदू पाटील, लक्ष्मण दगा पाटील काका- जातीची नोंद हिंदू पाटील, चुनिलाल दगा जाधव काका -जातीची नोंद हिंदू पाटील अशी सन १९६० ते २००७ मध्ये वंशावळ रक्तनात्यांची नोंदी "पाटील" जातीची  आहेत. बखतसिंग सत्तरसिंग जाधव ,कमलसिंग सत्तरसिंग जाधव ,चुनिलाल दगा जाधव यांच्या प्रकरणाची निकाल तारीख २९ एप्रिल २०२२ अन्वये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदूरबार यांनी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे.सन २०१३ नंतर जातीच्या नोंदीत पाटील  चे पावरा केल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या