महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन....
सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
अहिल्यानगर - शहरातील मार्केटयार्ड चौक येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व माळीवाडा वेस येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी चबुतरा उभारणे, परिसराचे सुशोभीकरणाचे भूमिपूजन २७ जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार व विधान परिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या अनावरण सोहळ्यास खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, माजी खासदार मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील, जिल्हाधिकारी मा. डॉ. पंकज आशीया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सचिव मा. गोरक्ष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, महाथेरो जगप्रसिद्ध भंते, विपश्यनाचार्य मा. डॉ. राहूल बोधी, सुप्रसिद्ध गायक मा. आनंदजी शिंदे हेही सन्माननीय मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महानगरपालिकेकडून मार्केटयार्ड चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मार्केटयार्ड येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
चांदणी चौक, मार्केट यार्ड चौक मार्गे पुणेकडे जाणारी सर्व वाहने कोठी चौक - महात्मा फुले चौक चाणक्य चौक - सक्कर चौकमार्गे जातील. तसेच, पुणेकडून सक्कर चौक - माळीवाडा मार्केटयार्डमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने सक्कर चौक - चाणक्य चौक - महात्मा फुले चौक - कोठी चौकमार्गे जातील. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
अहिल्यानगरवासियांनी, सर्व आंबेडकर प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त मा. यशवंत डांगे, उपायुक्त मा. संतोष टेंगले, मा. विजयकुमार मुंडे, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे आणि उप अभियंता श्रीकांत निंबाळकर, तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती, महात्मा फुले पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या