माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची आदिवासी संघटनांची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :- वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा व नंदूरबार जिल्हा पालकमंत्री पदावरून तात्काळ हटवा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट प्रमुख अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,बिलीचापडा अध्यक्ष वनसिंग पटले,किसन वसावे,हाना पटले आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे वादग्रस्त कृषी मंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे पावसाळी अधिवेशनात विधानसभेत पत्त्यांचा रमी खेळ खेळतानाचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.त्याचा आम्ही आदिवासी संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.महाराष्ट्र शासन भिकारी आहे,असे बोलतात. शेतकरी हे कर्जाच्या पैशातून लग्न साखरपुडे करत फिरतात, असे अनेक वादग्रस्त वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेली आहे.असा बेजबाबदार मंत्री कृषी मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही.
नंदूरबार जिल्हा हा आदिवासी बहूल जिल्हा आहे.जिल्ह्य़ात अनेक भयंकर समस्या सुरू आहेत. आजही नंदूरबार जिल्ह्य़ातील धडगांव अक्कलकुवा या तालुक्यात रस्ते नाहीत, त्यामुळे आमचे आदिवासी बांधव दवाखान्यापर्यंत पोहचायला बाम्बुलन्स चा वापर करत आहेत. त्यांना ॲम्बुलन्स उपलब्ध होत नाही.वाटेतच जंगलात गर्भवतींची प्रसूती होते.काही बालक व गर्भवती महिलांचा वाटेतच मृत्यू होते.शाळकरी विद्यार्थी लाकडापासून बनवलेल्या तात्पुरत्या धोकादायक पुलावरून जीवघेणा प्रवास करून शाळेत जातात. नदीवरून जीव मुठीत घेऊन शाळेत पोहचतात. जिल्ह्य़ात रस्ते,पाणी,वीज, शाळा,अंगणवाडीची सोय नाही.शेतक-यांना युरिया उपलब्ध नाही.पिकांच्या व खतांच्या समस्या सुरू आहेत.
नंदूरबार जिल्ह्य़ातील जनतेच्या मरणयातना सुरू असताना मात्र नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत पत्त्यांचा रमी खेळ खेळण्यात व्यस्त आहेत. ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे.नंदूरबार जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एक चांगला पालकमंत्री मिळणे आवश्यक आहे. विधानसभेत पत्त्यांचा रमी खेळ खेळणा-या अशा बेजबाबदार माणिकराव कोकाटे यांचा कृषी मंत्री व नंदूरबार पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या