लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :-शिवसेना ( शिंदे गट ) युवा सेना तालूकाप्रमूख ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड यांनी गाव तिथं युवा सेनेची शाखा तालूक्यातील ५२ ग्रामपंचायती व त्या अंतर्गत येणार्या वाडीतांड्यात तयार करून शिवसेना पक्ष सदस्य नोंदनीसाठी कौशल्य पणाला लावून काम केले आहे. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साचेबद्ध पक्षबांधनी व सदस्य नोंदनी करून पक्ष कार्यालयाकडे अहवाल पाठवीला. त्या अहवालाचे अवलोकन पक्ष संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकार्यानी केले असून उत्कृष्ट अशी साचेबद्ध मांडणी करून ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड यांनी सादर केलेल्या अहवालाचे मुंबईत शिवसेना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश भैय्या सरनाईक यांनी अवलोकन करूण उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल मुंबईत नूकताच ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड यांच्या पाठीवर कौतूकाची थाप देवून त्यांचा सन्मान व सत्कार करूण त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करतांना युवासेना तालूका प्रमूख ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड म्हणाले की, आमचे मार्गदर्शक आमदार बाबुराव कदम कोहळीकर, व तसेच शिवसेना जिल्हाप्रमूख विवेक देशमूख, जेष्ट नेते विजयजी वळसे पाटील, शिवराज पाटील कोहळीकर, युवासेना जिल्हाप्रमूख संदेश पाटील हडसनीकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमूख शितलताई भांगे पाटील, उपजिल्हाप्रमूख गौरव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेची गाव तिथं शाखा व शिवसेना पक्ष सदस्य नोंदनी केली असून, शिवसेनाप्रमूख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारप्रणाली प्रमाणे आमदार बाबुरावजी कदम साहेब रात्रंदिवस गोरगरीबाची कामे करीत असतात. त्यांच्या तालमीत आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत. आमदार महोदयांनी आम्हाला दिलेली शिकवन हीच आमच्या कार्याची खरी शिदोरी असून,आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना बांधनीसाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. यापुढेही सातत्य टिकवून पक्षाचे काम निष्ठेने करीत राहणार असल्याचे युवासेनातालूकाप्रमूख ज्ञानेश्वर पुठ्ठेवाड करंजीकर यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या