चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड येथील ग्रामपंचायतीचे 'रायगडवाडी' असे नामकरण करण्यात आले आहे. यापुर्वी या ग्रामपंचायतीचे नाव निझामपूर असे होते. हे नाव बदलावे अशी मागणी शिवप्रेमींकडून होत होती. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद देत 'रायगडवाडी' असे नामकरण केले आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीचे नामकरण रायगड वाडी करून लाखो शिवप्रेमी चे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या महायुती सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे साहेब यांनी केले त्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पश्चिम च्या वतीने जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी माढा पूर्वचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, योगेश बोबडे, माऊली हळवणकर, करकब मंडलाचे अध्यक्ष हर्षल कदम, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या