चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई, सायन कोळीवाडा येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगरातील विश्वशांती बुध्द विहार येथे रविवार दि. २७ जुलै २०२५ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सायन कोळीवाडा विधानसभा तालुक्यातील रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) तर्फे लायन्स क्लब संचालित लायन्स ताराचंद बाप्पा हॉस्पिटल असोसिएशनसह न्यू लाईफ हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबीर भरविण्यात आले होते.
पावसाळी पर्जन्य आजारापासून प्राथमिक आरोग्य तपासणी सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर असताना मोफत आरोग्य तपासणी शिबीर महत्वाची बाब ठरते तर अनेकदा आवश्यकतेवेळी वेळीच रक्त न मिळाल्याने नातेवाईकांची होणारी तारांबळ टाळण्यासाठी रक्तदान शिबिर मौलिक ठरते.
म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या स्तुत्य उपक्रमाला सायन कोळीवाडा तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला. ह्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, समाज सेवक मान्यवरांनी आपापल्या परिने योगदान दिले. महामानवांच्या जयंती निमित्त वायफळ खर्च करण्यापेक्षा असे उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने मानवंदना ठरते.
हे शिबीर आयोजित करणारे आयोजक रिपब्लिकन पक्ष (खोरिपा), सायन कोळीवाडा तालुकाध्यक्ष राजेंद्र माजलकर यांच्यासह पक्षाचे तालुका सचिव बाळकृष्ण पवार, महिला तालुकाध्यक्ष ज्योती शेट्टीयार, मुंबई जिल्हा सचिव विक्रांत पाटील, संघटक प्रकाश केदारे, वॉर्ड क्रमांक १७५ चे अध्यक्ष गणेश साठे, उपाध्यक्ष सनी सातपुते, वॉर्ड क्रमांक १७६ चे अध्यक्ष किसन शर्मा, उपाध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी अथक परिश्रमाने यशस्वी केले. त्याबरोबर विश्वशांती बुध्द विहार कमिटी मार्फत मिळालेल्या योगदानातून बुध्द विहाराचा परिसरासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. शेवटी प्रत्येक रक्तदाता यांना सन्मानपत्र व छत्री देऊन सन्मानित करण्यात आले.
0 टिप्पण्या