चित्रा न्युज प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील परसाड येथे बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळ शाखा कामठी कुही. भारतीय बौद्ध महासभा शाखा परसाड यांच्या संयुक्त विद्यमाने. वर्षा वाशीय धम्म देसना कार्यक्रम रविवार दिनांक -24/08/2025 रोज रविवारला स्थळ - संघर्ष धम्मविहार परसाड तालुका कामठी जिल्हा नागपूर येथे भजन गायनाच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील भीम शाहीर प्रदीप कडबे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून क्रांतिकारी महापुरुषांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीत सादर केले त्यांच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोनू ताई कुथे ( माजी पंचायत समिती सदस्य) सुरेश भाऊ डोंगरे ( ग्रामपंचायत उपसरपंच परसाड ) दिनेश जी ढोले ( माजी जिल्हा परिषद सदस्य ) प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे. ( प्रतिभावंत प्रबोधनकार नागपूर ) भीमराव पाटील. शाहीर पुरुषोत्तम खांडेकर. मनोज भाऊ कुथे ( ग्रामपंचायत सरपंच पडसाड ) उज्वलाताई पाटील ( माजी सरपंच ) रवीजी बोरकर केंद्रीय अध्यक्ष. विजय उ के. सविता नारनवरे. सुधाकरजी पाटील. प्रकाश भाऊ लांजेवार. रामदासजी तागडे. श्रीधरजी तागडे. शांताबाई शेंडे. तुला रामजी रामटेके. चंद्रमणी शेंडे. रवींद्र चव्हाण. राहुल निकोसे. बादल खांडेकर. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भाऊ नितनवरे यांनी केले मोठ्या संख्येने गावातील नागरिक गायक कलावंत उपस्थित होते.
0 टिप्पण्या