Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक मध्ये भर पावसात आदिवासींचा ऊलगुलान मोर्चा; बिरसा फायटर्स आक्रमक!

आदिवासी विकास मंत्र्याला पदावरून हटविण्याचे व मंत्री मूर्दाबाद नारे!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नंदूरबार : सकल आदिवासी समाजातर्फे दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथील तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन पर्यंत भरपावसात  ऊलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात बिरसा करे ऊलगुलान, ऊलगुलान,बाह्य स्त्रोत/ खाजगीकरण बंद करा,पेसा पदभरती झालीच पाहिजेत,आदिवासी कर्मचाऱ्यांना हजर करा,आदिवासींना न्याय द्या,न्याय द्या,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे,हम हमारा हक मांगते,नही किसीसे भिख मांगते,आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके हटाओ,आदिवासी विकास मंत्री मूर्दाबाद,निम का पत्ता कडवा है,आदिवासी विकास मंत्री......है?अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्स ने आक्रमक भूमिका घेतली.
                   या मोर्चात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची मुख्य भूमिका बिरसा फायटर्सचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बजावली.मोर्चात सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राज्य सचिव संजय दळवी,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,अक्षय शेल्टे, सुरेश पवार, दिलीप मुसळदे,राकेश मोरे,रोहित बर्डे,चैत्राम पवार, अजय पटले व मध्यप्रदेश मधील विजय  बरडे पानसेमल ब्लॉक अध्यक्ष रोहित बरडे सह नंदूरबार, धुळे,नाशिक जिल्ह्यासह मध्यप्रदेश मधील शेकडो बिरसा फायटर्स कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
                      शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची १७९१,पदे बाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे  खाजगीकरण द्वारे भरण्याचा शासन आदेश रद्द करावा,शासकीय आश्रमशाळेतील व वस्तीगृहातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदारी व तासिका तत्वावर हजर करून घ्यावे,१७ संवर्ग पेसा क्षेत्रातील पदभरती सुरू करा,शासकीय व  निमशासकीय सेवांमधील अनु जमातीचा अनुशेष भरा, बोगस आदिवासींनी बळकाविलेली १२५२० पदे रिक्त करुन ती खऱ्या आदिवासींमधून भरा, शासकीय वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा, डीबीटी योजना बंद करा,५ वी अनुसूचीचे सर्व हक्क व अधिकार लागू करा,वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा,अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा ऊलगुलान जन आक्रोश नाशिक मध्ये शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या