Ticker

6/recent/ticker-posts

नायगावचे सरपंच शिवाजी ससाणे राज्यस्तरीय “ग्रामरत्न सरपंच” पुरस्काराने सन्मानित....

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं 7058137098/9615179615

जामखेड :-  महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सक्रिय योगदान देणाऱ्या आजी माजी सरपंचांचा गौरव करण्यासाठी "ग्रामरत्न सरपंच सन्मान व पुरस्कार सोहळा २०२५" चे आयोजन २९ व ३० जुलै रोजी लोणावळा येथे करण्यात आले होते. 
         या सोहळ्यात नायगावचे  ग्रामपंचायतीचे सरपंच मा. शिवाजी ससाणे  यांचा राज्यस्तरीय "ग्रामरत्न सरपंच" हा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

        या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय सरपंच परिषद व पंचायत राज विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. ग्रामीण भागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना प्रेरणादायी मानले जात आहे.
या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विविध तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, सन्माननीय अतिथी, पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती. 
           यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील (कुडूकर) व राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या