Ticker

6/recent/ticker-posts

माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर येथे स्व.बापूसाहेब देशमुख यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सामाजिक प्रबोधन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
तळेगाव दशासर :-   कृषक सुधार मंडळ ,तळेगाव द द्वारा संचालित माध्यमिक कन्या विद्यालय ,तळेगाव येथे कृषक सुधार मंडळ तथा माध्यमिक कन्या विद्यालय चे संस्थापक अध्यक्ष प पु स्व बापूसाहेब देशमुख यांची 120वि जयंती मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिवाजीराव बापुराव देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली .प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामगीता प्रबोधनकार श्री विवेकमहाराज कुरूमकर,श्री विनोद रामेकार,श्री मोहनराव देशमुख ,श्री भरत लोया उद्यानपंडीत, श्री नरेंद्र रामावत माजी पंचायत समिती सदस्य ,श्री रवि चूटे ,श्री पंकज देशमुख , श्री आनंद देशमुख,सौ शुभांगी देशमुख,सौ अनुश्री देशमुख,सौ निता गवळी,श्री श्रेयस देशमुख,पत्रकार,श्री सुयोग ठाकरे,पोमेश थोरात, माणिक बगाडे शिक्षक पालक संघ सदस्य,शाळा  व्यवस्थापन समिती सदस्य व पालकवर्ग उपस्थित होते. जयंतीनिमित्य सामाजिक  प्रबोधनकार ,ग्रामगीता प्रसारक श्री विवेक महाराज कुरूमकर यांनी आपल्या प्रबोधनातून विद्यार्थिनींना आजच्या समाजातील विकृत परिस्थिती ची जाणीव करून दिली. मुलींनी आपल्या भविष्याचा विचार करून ध्येयपूर्तीसाठी शिक्षणाची कास धरावी असे प्रतिपादन केले.प्रमुख अतिथी  भरतभाऊ लोया यांनी  प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात AI च्या वापराणे शैक्षणिक प्रगती करावी असे सांगितले.माजी पंचायत समिती सदस्य श्री नरेंद्र रामावत यांनी मुलींच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.प्रास्ताविकामध्ये  मुख्याध्यापिका सौ देशमुख   प पु बापूसाहेबांचा  थोडक्यात जीवनपट सांगितला.अध्यक्षीय भाषणात मा श्री शिवाजीराव देशमुख यांनी बापूसाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.वर्ग 10 ची विद्यार्थिनी अलफिया  हुसेन हिने मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन कु .माधुरी पांडे यांनी व आभारप्रदर्शन कु  प्रतिभा मरसकोल्हे यांनी केले.सर्वांच्या सहकार्या ने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या