Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज...ईव्हीएम मशीन्स 'स्ट्राँग रूम'मध्ये सुरक्षित; ४१ मतदान केंद्रांवर कडेकोट व्यवस्था...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी "निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे," अशी माहिती दिली.
       प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मतदार यादी अद्ययावत करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापर्यंतची सर्व कामे वेगात पूर्ण करण्यात आली आहेत.
     ४१ केंद्रांवर ईव्हीएम सज्ज जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरात एकूण ४१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी ४१ कंट्रोल युनिट (CU) आणि ८२ बॅलेट युनिट (BU) ची आवश्यकता भासणार आहे. मात्र, कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त साठा तयार ठेवला आहे. यामध्ये एकूण ५० सी.यू. (CU) आणि ११४ बी.यू. (BU) तयार असून, मतदारांच्या माहितीसाठी डमी ईव्हीएम देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
       वाहतूक आराखडा आणि पोलीस बंदोबस्त निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, दुसरे प्रशिक्षण ३० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. तसेच, मतदान साहित्याच्या ने-आण करण्यासाठी वाहतूक आराखडाही तयार आहे. सध्या सर्व ईव्हीएम मशीन्स नागेश्वर सभागृहातील 'स्ट्राँग रूम'मध्ये ठेवण्यात आल्या असून, या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या