चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-उपजिल्हा रुग्णालयाअंतर्गत मोर्शी अंतर्गत मा डॉ प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शहरामध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून शिवाजी हायस्कूल मोर्शी येथील विद्यार्थ्यां मार्फत प्रभात फेरीचे आयोजन करून कुष्ठरोग जनजागृती करण्यात आली. यावेळी शाळेमध्ये कुष्ठरोग जनजागृती पर कार्यक्रम साजरा करण्यात आला. रुग्णालयाचे कर्मचारी निळकंठ ढवळी (कुष्ठरोग तंत्रज्ञ) यांनी कुष्ठरोग ओळख उपाय तसेच पंतप्रधान यांचे 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त भारत करावयाचे उद्दिष्ट या विषयावर माहिती दिली. श्री रितेश पुंड (क्षयरोग पर्यवेक्षक) यांनी क्षयरोगाबाबत माहिती दिली.
यावेळी रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी विनय शेलूरे, प्रशांत बेहरे शाळेचे उपमुख्याध्यापक मिलिंद ढाकुलकर, पर्यवेक्षक नवरे सर, मनीष केचे, अशोक चौधरी इत्यादी शिक्षक वृंद हजर होते


0 टिप्पण्या