Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाने योजनेतून पैसे देऊन मते घेण्याचा नवीन फंडा :- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे...भाजपा चे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे :- आमदार रोहित पवार...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणुकीत तुम्हाला उमेदवार कसे हवेत सर्व सामान्य नागरिकांचे काम करणारे हवेत की दहशत निर्माण करणारे सध्या भाजपाने योजनेमधून पैसे देऊन मते घेण्याचा नवीन फंडा आणला आहे. फक्त विरोधकांची चौकशी करायची पक्षातील लोक सेफ ठेवायचे असे धोरण सुरू आहे. हि निवडणुक स्वाभीमानाची आहे. तेव्हा मतदारांनी ठरवायचे आहे तुम्हाला उमेदवार कसे हवेत असे जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सांगितले.
         त्यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाचे उमेदवार ठेकेदार, मटकापेडी, सावकार अशा लोकांना दिलेली आहे.
       आपले उमेदवार सर्व सामान्य आहेत. निर्भय भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे त्यासाठी आपले उमेदवार सक्षम आहेत. गेल्या पाच सहा वर्षात कर्जत जामखेड बारामती खालोखाल दिसून येत आहे याचे शिल्पकार रोहित पवार हेच आहेत. यावेळी भाजपाच्या उमेदवारावरील गुन्हे याचे वाचन सुषमा अंधारे यांनी केले.
 त्यावेळी प्रदेश सचिव सुभान अली शेख म्हणाले की, 
जामखेड शहरासाठी आमदार रोहित पवार यांनी ५३७ कोटी रुपयांची कामे आणली हेही फक्त अडिच वर्षात या आगोदर भाजप आमदार काय करत होते. काँग्रेस चा उमेदवार डाँन आहे. ती भाजपाची बी टिम आहे. विधानसभेत भाजपाचे काम करणाऱ्यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली. महाराष्ट्रात मराठा हितासाठी मुस्लिम काम करतो.
        त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. तसेच विरोधी भाजपा उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची कुंडलीच काढली, काही सावकार, जागा बळकावणारे, जमिनीचा ताबा घेणारे, मटका, यातील आहेत. तेव्हा मतदारांनीच ठरवावे तुम्हाला काय हवे असे आमदार रोहित पवार म्हणाले.
         त्यावेळी महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव सुभान अली शेख, दादाभाऊ कळमकर, खासदार निलेश लंके,  आमदार रोहित पवार, माजी सभापती संजय वराट, ता. अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी सभापती सुर्यकांत मोरे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, मंगेश आजबे, रमेश आजबे, प्रहारचे नय्युम सुभेदार, सुनील कोठारी, गणेश उगले, शिवसेना तालुकाप्रमुख अँड मयूर डोके, शहाजी राळेभात, सुरेश भोसले, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, माजी उपसभापती कैलास वराट, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, बापुसाहेब कार्ले, राजेंद्र पवार, सुधीर राळेभात, विठ्ठल चव्हाण, सुनील उगले, भानुदास बोराटे, प्रशांत राळेभात, महेश राळेभात, जुबेर शेख, अनिल बाबर, सुनील जावळे, वैजनाथ पोले, संतोष पवार, इस्माईल सय्यद, समीर पठाण, बाबासाहेब मगर, अभय शिंगवी, डॉ. कैलास हजारे यांच्या सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या