Ticker

6/recent/ticker-posts

नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रदीप उर्फ कुंडल राळेभात शिवसेनेचा हुकुमी एक्का - सुषमाताई अंधारे...

सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७मध्ये शिवसेना (उबाठा गट) चे मशाल चिन्हावर उमेदवार प्रा. प्रदीप उर्फ कुंडल राळेभात यांची महाविकास आघाडीने हुकुमी एक्का म्हणून निवड करत अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या एकाच जागेसाठी आघाडीने राळेभात यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना निर्णायक संधी दिली आहे.
        दिनांक २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचार सभेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राळेभात यांना मिळालेली ही उमेदवारी न्याय व लायक असल्याचे सांगत, जामखेड नगर परिषदेत प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेनेचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले असून आमदार रोहित पवार यांचे धन्यवाद देत म्हणाल्या की, नगर परिषदेत सत्ता महाविकास आघाडीची येणार असून स्वीकृत नगरसेवक शिवसेनेचा द्यावा, अशी ठाम मागणी सभागृहातून केली.
       सुषमा अंधारे यांनी राळेभात यांच्या सामाजिक कामाचा, प्रभागातील लोकांमधील संपकाचा आणि उभ्या राहिलेल्या विश्वासाचा विशेष उल्लेख करत, ही निवडणूक प्रभागाच्या विकासासाठी निर्णायक ठरेल, असे मत व्यक्त केले. त्यांच्या भाषणामुळे सभेला उपस्थित असलेल्या कार्यकत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून प्रभाग ७ मधील लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या